आॅस्ट्रेलियाचा भारतावर ४ धावांनी विजय

ब्रिस्बेन : भारत वि आॅस्ट्रेलिया यांच्यातील तीन टी२० क्रिकेट सामन्याच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात आॅस्ट्रेलियाने भारताचा ४ धावांनी पराभव केला आहे. भारताकडून शिखर धवनने ४२ चेडूंत ७६ धावा केल्या ,पण संघाला विजय मिळवून देण्यास तो अपयशी ठरला.

तत्पूर्वी भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना आॅस्ट्रेलियाच्या संघाने अॅरन फिंच २७, मार्कस स्टाॅइनिस ३३, ख्रिस लिन ३७ आणि ग्लेन मॅक्सवेलच्या ४६ धावांच्या जोरावर आॅस्ट्रेलियाने १७ षटकात ४ बाद १५८ धावा केल्या. पावसामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार भारताला १७ षटकामध्ये १७३ धावांचे आव्हान मिळाले.

विजयासाठी १७३ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ १७ षटकात ७ बाद १६९ धावांच करू शकला. भारताकडून शिखर धवनने ७६, दिनेश कार्तिकने ३० तर पंतने २० धावा केल्या.

अॅडम झाम्पाने ४ षटकात २२ धावा देत २ गडी बाद केले. झाम्पाने भारताच्या विराट कोहली आणि लोकेश राहुल या महत्वाच्या फलंदाजाना माघारी धाडत संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली. त्याच्या या कामगिरीबदल त्याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)