#AusvInd : भारताचा 34 धावांनी पराभव

-रोहित शर्माची शतकीखेळी व्यर्थ
-4 बळी मिळवणारा जेह्य रिचर्डसन सामनावीर
-ऑस्ट्रेलियाची मालिकेत 1-0 ने आघाडी

सिडनी – रोहित शर्माने केलेल्या शतकी खेळीनंतरही इतर फलंदाजांनी केलेल्या निराशाजनक कामगिरीने भारतीय संघाचा 34 धावांनी पराभव झाला असून या विजयाने ऑस्ट्रेलियाने 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 1-0ने आघाडी घेतली आहे.

यावेळी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने निर्धारीत 50 षटकांत 5 बाद 288 धावांची मजल मारत भारतीय संघासमोर विजयासाठी 289 धावांचे आव्हान ठेवले होते. प्रत्युत्तरात फलंदाजी करताना भारतीय संघाला निर्धारीत 50 षटकांमध्ये 9 बाद 254 धावांचीच मजल मारता आल्याने भारताला 34 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रत्युत्तरात खेळताना भारताची सुरूवात खराब झाली. भारताचा सलामीवीर शिखर धवन पहिल्याच षटकात केवल एक चेंडू खेळून परतला. तर, कर्णधार विराट कोहली देखिल केवल तीन धावा करुन परतल्याने भारताची 2 बाद चार अशी अवस्था झाली. त्यानंतर आशिया चषकात खोऱ्याने धावा काढणारा अंबाती रायुडू देखिल एकही धाव न करता माघारी परतल्याने भारताच्या पहिल्या तीन विकेट्‌स केवळ 4 धावांवर परतल्या होत्या. यानंतर भारतीय संघाचा यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मा यांनी सावध खेळी करताना भारतीय संघाचा डाव सावरायला सुरूवात केली. त्यामुळे पहिल्या 10 षटकांमध्ये भारतीय संघाने केवळ 21 धावांचीच मजल मारली होती. तर, 16 व्या षटकांत भारताने 47 धावांपर्यंतच मजल मारली होती. यानंतरच्या षटकात भारतीय संघाने अर्धशतकी वेस ओलांडली.

यावेळी दोघांनीही सावध खेळी करत संघाला शतकी वेस ओलांडून दिली. त्यात रोहितने आपले अर्धशतक पूर्णकरत भारताचा डाव सावरण्यात मोलाची भुमिका बजावली. यावेळी संघाच्या 142 धावा झाल्यानंतर धोनी देखिल 51 धावा करुन बाद झाला. धोनीने 96 चेंडूत 3 चौकार आणि एका षतकाराच्या मदतीने 51 धावांची मजल मारली. यावेळी धोनीने आपल्या कारकिर्दीतील 68वे र्धशतक पुर्ण केले.

तत्पूर्वी धोनीने रोहित सोबत चौथ्या गड्यासाठी 137 धावांची भागिदारी नोंदवली. धोनी बाद झाल्यानंतर आलेल्या दिनेश कार्तिकलाही विशेष चमक दाखवता आली नाही. 12 धावांवर असताना रिचर्डसनने त्याला बाद करत आपला तिसरा बळी मिळवला. त्यामुळे रुलावर आलेली भारतीय संघाची गाडी पुन्हा घसरली. त्यामुळे भारताची 5 बाद 176 अशी अवस्था झाली. यावेळी एका बाजुने सावध फलंदाजी करणाऱ्या रोहितने आपले 22वे शतक झळकावले.

शतक झाल्यानंतर रोहितने आपल्या धावगतीत वाढकरत चौफेर फटकेबाजीस सुरूवात केली. यावेळी रविंद्र जडेजादेखिल केवळ 8 धावाकरुन परतला. त्यामुळे रोहितवर दडपण आले आणि मोठे फतके मारण्याच्या नादात तो बाद झाला. यावेळी रोहितने 129 चेंडूत 10 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 133 धावांची खेळी करत एकाकी लढत दिली.

रोहित बाद झाल्यानंतर भारताचा पराभव जवळपास निश्‍चीतच झाला होता. मात्र, भुवनेश्‍वर कुमारने अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. यावेळी भुवनेश्‍वरने 23 चेंडूत 4 चौकारांच्या मदतिने 29 धावा करत भारताला 250 धावांचा टप्पा ओलांडून देत संघाला 254 धावांवर मजल मारुन दिली. यावेळी ऑस्ट्रेलियाकडून ज्येह रिचर्डसनने 26 धावांमध्ये 4 गडी बाद करत भरतीय संघाला पराभवाच्या खाईत लोटले.

तत्पूर्वी, उस्मान ख्वाजा (59), शॉन मार्श (54) आणि पीटर हॅंड्‌सकोम्ब (73) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 289 धावांचे आव्हान ठेवले होते. यावेळी मार्कस स्टोइनिसने अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी करताना ऑस्ट्रेलियाला समाधानकारक पल्ला गाठून दिला. स्टोइनिसने 47 धावांची खेळी केली. तर, भारताकडून भुवनेश्वर कुमार व कुलदीप यादव यांना प्रत्येकी दोन बळी मिळवले.

संक्षिप्त धावफलक – ऑस्ट्रेलिया 50 षटकांत 5 बाद 288 (पीटर हॅंड्‌सकोम्ब 73, उस्मान ख्वाजा 59, शॉन मार्श 54, कुलदीप यादव 54-2, भुवनेश्‍वर कुमार 66-2) विजयी विरुद्ध भारत 50 षटकांत 9 बाद 254 (रोहित शर्मा 133, महेंद्रसिंग धोनी 51, भुवनेश्‍वर कुमार 29, ज्येह रिचर्डसन 26-4, जेसन बेहेरेन्डॉर्फ 39-2).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)