#AUSvIND T20 Series : भारताचा विराट विजय; मालिका 1-1 ने बरोबरीत

सिडनी : विराट कोहलीच्या नाबाद 61 धावांच्या जोरावर भारताने आॅस्ट्रेलिया विरूध्दचा अखेरचा आणि निर्णयाक टी20 सामना जिंकत मालिकेत बरोबरी साधली आहे. भारत आणि आॅस्ट्रेलिया यांच्यातील तीन टी20 क्रिकेट सामन्यांची मालिका ही 1-1 ने बरोबरीत सुटली आहे.

दरम्यान आॅस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 164 धावा केल्या होत्या. भारताकडून क्रुणाल पांड्याने 4 षटकात 36 धावा देत 4 विकेट घेतल्या. तर कुलदीप यादवने एक विकेट घेतली. विजयासाठी 165 धावांचे आव्हान भारताने 19.4 षटकात 4 बाद 168 धावा करत पूर्ण केले.

-Ads-

भारताकडून फलंदाजीत सलामीवीर रोहित शर्माने 23(16) तर शिखर धवनने 41(22) धावा केल्या. तर विराट कोहलीने 41 चेंडूत दोन षटकार आणि चार चौकारासह नाबाद 61 धावा केल्या, तर दिनेश कार्तिकने 18 चेंडूत एक चौकार आणि एक षटकारासह 22 धावा करत भारतीय संघाला दणदणीत विजय मिळवून दिला.

दरम्यान तीन टी20 सामन्याच्या मालिकेतील पहिला सामना आॅस्ट्रेलियाने जिंकला होता तर दुसरा सामना पावसामुळे रद्द झाला होता. आजच्या भारताच्या विजयासह भारत वि आॅस्ट्रेलिया यांच्यातील मालिका 1-1 ने बरोबरीत सुटली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
1 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)