#AUSvIND : नाणेफेक जिंकून भारताचा फलंदाजीचा निर्णय, भारत 8 बाद 210

एडिलेड – भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिकेला आजपासून सुरूवात झाली आहे. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला आहे. भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. ताज्या वृत्तानुसार भारताच्या 8 बाद 210 धावा झालेल्या आहेत.

भारताचे सलामीवीर स्वस्तात माघारी धाडले गेले. लोकेश राहुल 2 तर मुरली विजय हा 11 धावावर बाद झाला. त्यानंतर आलेला कर्णधार कोहलीही स्वस्तात बाद झाला.कोहलीला पॅट कमिन्सने 3 धावावर झेलबाद केले. उपकर्णधार अंजिक्य रहाणे 13 धावा करू शकला.

-Ads-

सध्या भारताने 200 धावांचा आकडा पार केला असून चेतेश्वर पूजारा हा 89 धावावर तर मोहम्मद शमी नुकताच खेळण्यास आला आहे.

भारताने सामन्याच्या एक दिवस आधी 12 सदस्यांचा संघ जाहिर केला होता. त्यापैकी हनुमा विहारी याला अंतिम 11 मध्ये स्थान देण्यात आलेले नाही.

भारतीय संघ –

मुरली विजय, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, ऋषभ पंत, रविचंद्रनअश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, इशांत शर्मा

ऑस्ट्रेलिया संघ –

आरोन फ़िंच, मार्कस हैरिस, उस्मान ख्वाजा, शॉन मार्श, पीटर हैंड्सकॉम्ब, ट्रैविस हेड, टिम पेन, पैट कमिन्स, मिचेल स्टार्क, जोश हेज़लवुड, नाथन लायन


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)