#AusvInd : सामन्यावर भारतीय संघाचा दबदबा

-पावसामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ लवकर थांबवला
-दिवसअखेर ऑस्ट्रेलियाची 6 बाद 236 धावांची मजल

सिडनी  -भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या कसोटीचा तिसऱ्या दिवशीचा खेळ अपुऱ्या सूर्यप्रकाशामुळे थांबवण्यात आला. त्यावेळी दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने 6 बाद 236 धावांपर्यंत मजल मारली असून अद्यापही ते 386 धावांनी पिछाडीवर असून फॉलोऑन टालण्यासाठी त्यांना अजून 186 धावांची गरज आहे.

भारतीय संघातील फलंदाजांनी पहिल्या आणि दुसऱ्या दिवशीच्या खेळात केलेल्या दमदार फलंदाजीच्या बळावर आपल्या पहिल्या डावात 7 बाद 622 धावांची मजल मारत आपला डाव घोषित केल्यानंतर मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी सावध आणि संयमी खेळी करत संघाला चांगली सुरुवात करून दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ऍरोन फिंचला बाहेर बसवले होते. या सामन्यात त्याच्या जागी सलामीला आलेल्या उस्मान ख्वाजाने मार्कस हॅरिसच्या साथीत सावध खेळी साकारली. तर, हॅरिस दुसऱ्या बाजूने भारतीय गोलंदाजांची धुलाई करत होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने आजच्या दिवसाच्या पहिल्या सत्रावर वर्चस्व गाजवताना दिसून आली.

मात्र, चहापाणाला काहीवेळ शिल्लक असताना 21व्या षटकांत कुलदीप यादवने सावध फलंदाजी करणाऱ्या ख्वाजाला बाद करत भारताला पहिला बळी मिळवून दिला. यावेळी ख्वाजाने 27 धावांची खेळी केली. तर, हॅरिसच्या साथीत 72 धावांची सलामी दिली. हि या मालिकेत ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी दिलेली दुसरी मोठी सलामी आहे.

ख्वाजा बाद झाल्यानंतर फलंदाजीस आलेल्या मार्नस लेबसचगनेही सावध पवित्रा स्वीकारत हॅरिसच्या साथीत संघाचा डाव सावरला. त्यामुळे उपहारापर्यंत ऑस्ट्रेलियाने 1 बाद 122 धावांची मजल मारत भारताला चोख प्रत्युत्तर दिले. मात्र, उपहारानंतर केवळ 6 धावांचीच वाढ झाल्यानंतर जडेजाने जम बसलेल्या मार्कस हॅरिसला बोल्ड करत भारताला आवश्‍यक असलेला ब्रेक थ्रू मिळवून दिला. यावेळी हॅरिसने 120 चेंडूत 79 धावांची खेळी केली. तर, मार्नस लेबसचगनेसह त्याने दुसऱ्या गड्यासाठी 56 धावांची भागिदारी नोंदवली.

हॅरिस बाद झाल्यानंतर आलेल्या शॉन मार्शलाही जडेजाने 8 धावांवर माघारी पाठवत ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्‍का दिला. तर, यानंतर शमीने जम बसलेल्या मार्नस लेबसचगनेला 38 धावांवर बाद करत ऑस्ट्रेलियाला चौथा धक्का दिला. स्लिपमध्ये उभारलेल्या अजिंक्‍य रहाणेने अप्रतिम झेल टिपला.

4 फलंदाज तंबूत परतल्यानंतर आलेल्या ट्रॅविस हेड आणि पिटर हॅंडस्कोम्ब यांनी सावध पवित्रा घेत ऑस्ट्रेलियाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पाचव्या गड्यासाठी 40 धावांची भागीदारी रचली. मात्र, 20 धावांवर फलंदाजी करत असलेल्या हेडला बाद करत कुलदीपने ही जमलेली जोडी फोडत ऑस्ट्रेलियाला पाचवा धक्‍का दिला. त्याने हेडचा आपल्याच गोलंदाजीवर उत्कृष्ट झेल पकडला. हेड बाद झाल्याने चहापानापर्यंत ऑस्ट्रेलियाचा 198 धावांमध्येच निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला होता.

तर, चहापानानंतर कुलदीप यादवने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेनला 5 धावांवर बाद करत त्यांना सहावा धक्का दिला. यानंतर फलंदाजीस आलेल्या कमिन्सला साथित घेत हॅंडस्कोम्बने संघाचा डाव सावरायला सुरुवात केली. या दोघांनी सातव्या गड्यासाठी नाबाद 38 धावांची भागीदारी केली. अखेर खराब सूर्यप्रकाशामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला. सामना थांबला त्यावेळी ऑस्ट्रेलियाच्या 83.3 षटकांत 6 बाद 236 धावा झाल्या होत्या. हॅंडस्कब 28 तर कमिन्स 25 धावांवर खेळत आहेत. भारताकडून कुलदीप यादवने 3 जडेजाने 2 तर शमीने 1 बळी मिळवला.

संक्षिप्त धावफलक –

भारत पहिला डाव – 167.2 षटकांत 7 बाद 622 घोषित (चेतेश्‍वर पुजारा 193, ऋषभ पंत नाबाद 159, रवींद्र जडेजा 81, मयंक अग्रवाल 77, नॅथन लायन 174-4, जोश हेझलवूड 105-2, मिचेल स्टार्क 123-1), ऑस्ट्रेलिया पहिला डाव 83.3 षटकांत 6 बाद 236 (मार्कस हॅरिस 79, उस्मान ख्वाजा 27, मार्नस लेबसचगने 38, कुलदीप यादव 71-3, रविंद्र जडेजा 62-2).


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)