पाकविरूध्दच्या कसोटी मालिकेआधी ऑस्ट्रेलियाच्या संघाला दोन झटके

दोन जलगती गोलंदाज झाले बाहेर 
मेलबर्न – स्टीव स्मिथ आणि डेवीड वाॅर्नर सारखे प्रमुख खेळाडू चेंडू कुरतडण्याच्या प्रकरणात दोषी आढळले आहेत. यामुळे आॅस्ट्रोलियाचा संघ कमकुवत झाला आहे. त्यातच पाकिस्तान विरूध्द होणाऱ्या मालिकेआधी दोन मोठे झटके बसले आहेत.
संघाचे दोन प्रमुख जलगती गोलंदांज पॅट कमिंस आणि जाॅश हेजलवूड आॅक्टोबरमध्ये होणाऱ्या मालिकेतून संघाबाहेर झाले आहेत. दोन्हीही खेळाडू पाठदुखीने त्रस्त आहेत.
पाठदुखीच्या कारणामुळे ते तंदरूस्त नाही आहेत. त्यामुळे त्यांची संघात निवड होऊ शकली नाही अशी माहिती आॅस्ट्रोलियन संघाचे फिजियोथेरेपिस्ट डेविड बेकली यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)