#AUSvIND : रोहितचे पेनला प्रत्युत्तर

मेलबर्न – तिसऱ्या कसोटीत दुसऱ्या दिवशी खेळपट्टीवर रोहित शर्मा खेळत असताना पेनेने रोहितचे लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न केला. जर रोहितने या कसोटीत षटकार मारला तर मी मुंबईला पाठिंबा देणार असे म्हणत पेनने रोहितला डिवचले होते. त्याचे प्रत्युत्तर रोहितने तिसऱ्या दिवशी सामना सुरू होण्यापूर्वी दिले. रोहित म्हणाला, जर पेनने शतक ठोकले तर त्याला मुंबई इंडियन्स संघासाठी त्याला विकत घेण्यात येईल.

या विषयी बोलताना रोहित म्हणाला, मी फलंदाजी करताना पेनचे वक्तव्य ऐकले होते. मात्र, त्यावेळी विचलीत न होता मी माझ्या फलंदाजीवर लक्ष केंद्रीत केले. या घटनेची चर्चा मी अजिंक्‍य राहणेशी केली असता, त्याला मी म्हटले, जर पेनने शतक ठोकले तर त्याला मुंबई इंडियन्सच्या बॉसला त्याला विकत घेण्याची शिफारस करेन. मात्र, पेनने ही संधी दवडली. पहिल्या डावात टीम पेन 22 धावांवर बाद झाला. त्याला बुमराहने बाद केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दुसऱ्या कसोटीत पेन आणि विराट हे कर्णधार एकमेकांसमोर आले होते. त्यांच्यात शाब्दिक चकमकही झाली होती. त्या पार्श्वभूमीवर या सामन्यात वातावरण तापणार असे वाटत होते. पण, विनोदी संभाषणापलिकडे अजून तरी काही विशेष घडलेले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)