पंतचे ‘हंगामी कर्णधार’ म्हणत ‘पेन’फुल प्रत्युत्तर

भारताच्या दुसऱ्या डावात पंत फलंदाजी करण्यासाठी आल्यावर त्याचे लक्ष विचलीत करण्यासाठी पेनने त्याला डिवचले होते. पंतला एकदिवसीय संघातून वगळण्यात आले आहे. यावरुन पेन म्हणाला होता की एकदिवसीय संघात धोनी परतला आहे. आता आपण पंतला हॅरिकेन्स (बिग बॅशमधील संघ) संघात घेऊ. तुला हॉबर्ट शहरात एक फ्लॅट घेऊन देतो तेथे तू माझ्या मुलाचा सांभाळ कर. पेनने हे वक्तव्य पंतचे लक्ष विचलित करण्यासाठी केले होते. मात्र, पंतने त्यावेळी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रीया देणे टाळले होते.

मात्र, भारताने दिलेल्या 399 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाचे पाच बळी गेल्यानंतर फलंदाजीस उतरलेल्या कर्णधार टिम पेनची हंगामी कर्णधारपदावरुन चेष्टा केली. पंत सिली पॉईंटला क्षेत्ररक्षणासाठी उभा असलेल्या मयंक अग्रवालला म्हणाला की आपल्याकडे आज एक विशेष पाहुणे आले आहेत.

तू कधी हंगामी कर्णधाराबद्दल ऐकले आहेस का? हा खेळाडू हंगामी कर्णधार आहे. याला बोलण्याशिवाय दुसर काही येत नाही. त्याला बाद करायला तुम्हाला विशेष परिश्रम घेण्याची गरज नाही. तो आपोआप बाद होइल, तुम्ही फक्त गोलंदाजी करा तो बाद होइल. असे म्हणत पंतने पेनला जश्‍यास तशे प्रत्युत्तर दिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
3 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)