#INDvsAUS : पहिल्या दिवसअखेर भारत 9 बाद 250; पुजाराचे शतक

एडिलेड – ऑस्ट्रेलियाविरूध्दच्या पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवसअखेर चेतेश्वर पूजाराज्या शतकाच्या बळावर 9 बाद 250 धावा केल्या आहेत. भारताच्या भरवशाच्या फलंदाजानी निराशाजनक कामगिरी केली. मात्र पूजाराने भारताची दुसरी बाजू चांगली सावरत भारताला 200 धावांचा आकडा पार करून दिला. पूजारा याने 246 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकारांसह 123 धावांची खेळी केली. पॅट कमिन्सने त्याला धावबाद करत त्याची खेळी संपुष्टात आणली.

ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी करत भारताच्या सलामीवीरांना लवकर माघारी धाडले. लोकेश राहुल 2 तर मुरली विजय हा 11 धावावर बाद झाला. त्यानंतर आलेला कर्णधार कोहलीही स्वस्तात बाद झाला.कोहलीला पॅट कमिन्सने 3 धावावर झेलबाद केले. उपकर्णधार अंजिक्य रहाणे 13 धावा करू शकला. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड, पॅट कमिन्स आणि नॅथन लियाॅन यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.

-Ads-

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये चार कसोटी क्रिकेट मालिकेला आजपासून सुरूवात झाली आहे. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला. भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पंरतु विराटचा हा निर्णय अक्षरश चुकीचा ठरला. ऑस्ट्रेलियन गोलंदाजीच्या भेदक माऱ्यासमोर भारताची अवस्था 4 बाद 41 अशी झाली होती. पण पूजाराने रोहित शर्मा, ऋषभ पंत आणि अश्विन यांच्या साथीने भारताचा डाव सावरला. रोहितने 37 तर पंत आणि अश्विन यांनी प्रत्येकी 25 धावा केल्या. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा खेळपट्टीवर मोहम्मद शमी हा नाबाद 6 धावांवर टिकून आहे.भारताचा नववा फलंदाज म्हणून पूजारा बाद झाला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)