चेंडूच्या वेगात बदल हेच विजयाचे कारण – स्टोईनिस

ब्रिस्बेन – भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारतीय संघाचा 4 धावांनी पराभव झाला. यावेळी अखेरच्या षटकांत दिनेश कार्तिक आणि कृनाल पांड्यायांचा बळी मिळवणाऱ्या मार्कस स्टोईनिसने संघाच्या रणनितीला विजयाचे श्रेय देताना सांगितले की, अखेरच्या षटकांमध्ये चेंडूचा वेग बदलण्याची आम्ही रणनिती आखली होती आणि त्याचाच फायदा आम्हालासामन्यात विजय मिळवताना झाला.

यावेळी बोलताना त्याने सांगितले, कर्णधार ऍरोन फिंचने सामन्याच्या वेळी मला सांगितले होते की, सामन्यातील अखेरचे षटक तुला टाकायचे आहे आणि त्यावेली चेंडूची गती कमी ठेवायची. कारण, गाबाचे मैदान हे इतर मैदानांच्या तुलनेने मोठे मैदान आहे. त्याठिकाणी षतकार मारने अवघड आहे. त्यामुळे धिम्या गतीच्या चेंडूवर त्यांना षटकार मारणे अवघड जाईल आणि आम्हाला त्याचा फायदा होईल असे आमचे समिकरण होते आणि आम्हाला ते अखेरच्या षटकात तंतोतंत कामी आले.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)