औरंगाबादची जागा एआयएमआयएमकडे; प्रकाश आंबेडकरांची नवी खेळी

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज आपण वंचित बहुजन आघाडीतील महत्वाचा सहयोगी पक्ष असलेल्या एआयएमआयएमचे अध्यक्ष असादुद्दीन ओवेसी यांच्याशी चर्चा केली असून त्यांना औरंगाबाद येथील लोकसभेची जागा लढविण्यासाठी तयार केले असल्याची माहिती दिली आहे. याबाबत बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले की, “असादुद्दीन ओवैसी यांना मी महाराष्ट्रातून लोकसभेच्या दोन जागा लढविण्याची विनंती केली असून त्यांनी औरंगाबाद येथील जागा लढविण्याची तयारी दर्शवली आहे. तर मुंबई (उत्तर मध्य) येथील जागा लढविण्याबाबत ओवैसी दोन दिवसांमध्ये कौल देणार आहेत. औरंगाबाद येथील उमेदवाराचे नाव एआयएमआयएमकडून लवकरच घोषित केले जाणार आहे.”

मुंबई (उत्तर मध्य) येथून भाजपच्या पूनम महाजन या खासदार असून आता वंचित बहुजन आघाडीतील एआयएमआयएम पक्षाला प्रकाश आंबेडकर यांनी ही जागा लढविण्यासाठी गळ घातली असल्याने एआयएमआयएमने ही जागा लढवल्यास आगामी निवडणुकीमध्ये भाजपच्या खासदार पूनम महाजन यांच्या मतदारसंघामध्ये उलथापालथ घडू शकेल काय? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

तत्पूर्वी औरंगाबाद येथील जागा बहुजन वंचित आघाडीने बी. जी. कोळसे पाटील यांना दिल्याने भारिप तसेच एआयएमआयएमच्या स्थानिक नेत्यांमध्ये नाराजीचा सूर निर्माण झाला होता मात्र आता प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबादची जागाच एमआयएमच्या पारड्यात टाकल्याने स्थानिकांची नाराजी दूर करण्यामध्ये प्रकाश आंबेडकर यशस्वी झाल्याचे चित्र आहे.

https://twitter.com/ANI/status/1106910419866865664

Ads

2 COMMENTS

  1. पण बी जे कोळशे पाटील हे बेस्ट उमेदवार होते
    त्याना कायदा आणि
    बऱ्याच गोष्टी चा अभ्यास आहे
    amiam कडे असाच उमेदवार असेल तर काही हरकत नाही

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)