स्टीव्ह स्मिथच्या पुनरागमनाकडे लक्ष

जयपूर – बॉल टेम्परिंग प्रकरणी बंदीची शिक्षा भोगलेला ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ आज आयपीएलच्या राजस्थान रॉयल्स संघातून पुनरागमन करणार आहे. आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात खेळताना डेव्हिड वॉर्नरने दमदार खेळी करत पुनरागमन केले. त्यामुळे स्टीव्ह स्मिथ कशी कामगिरी करणार याकडे सगळयांचे लक्ष लागले आहे.

स्टिव्ह स्मिथवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने घातलेली १ वर्षाची बंदी २९ मार्चला संपणार आहे आणि राजस्थान रॉयलचा २५ मार्चला होणार आहे. तसेच ३० मे पासून इंग्लंड मध्ये सुरु होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत परतण्यासाठी आयपीएलची कामगिरी स्टिव्ह स्मिथला महत्वाची ठरणार आहे.

सध्या राजस्थान रॉयल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाबचा सामना सुरु झालेला आहे. राजस्थान रॉयल्स प्रथम गोलंदाजी करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)