मित्र पक्षांच्या भूमिकेकडे लक्ष

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजप-सेनेची युती झाली त्यानंतर जागावाटपही जवळजवळ पक्‍के झाले. प्रचाराची एकत्रित आखणीसुद्धा झाली पण मित्रपक्षांच्या वाट्याला अद्याप काहीच मिळालेले नाही. त्यामुळे आता मित्रपक्ष नक्की काय भूमिका घेणार याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.

भाजप-शिवसेनेच्या युतीमध्ये महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष, सदाभाऊ खोत यांची रयत संघटना आणि आरपीआयचे नेते रामदास आठवले हे प्रमुख मित्र पक्ष आहेत. या तिघांना भाजपाने मंत्रिपद दिले आहे. त्यात आठवले हे केंद्रात मंत्री आहेत पण आता लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात त्यांच्यासाठी अद्याप कुठलाही मतदारसंघ सोडण्यात आलेला नाही. शिवसेनेच्या कोट्यात असणारा दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघ हा आठवले यांनी मागितला होता पण या मतदारसंघातून राहुल शेवाळे हे खासदार आहेत आणि दोन दिवसापूर्वीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेवाळे हेच पुन्हा उमेदवार असल्याचे जाहीर केल्याने आता आठवले यांची पुन्हा पंचाईत झाली आहे आता त्यांच्यासाठी कुठला मतदारसंघ सोडण्यात येणार हे भाजपाकडून निश्‍चित झालेले नाही. त्याबाबत आठवले यांनीसुद्धा अनेकदा भाजपाकडे मागणी केली असली तरी सध्या ते राज्यसभेचे सदस्य आहेत.

-Ads-

दुसरीकडे राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर हे मात्र लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. गेल्या वेळेला बारामती मतदारसंघातून त्यांनी सुप्रिया सुळे यांची दमछाक केली होती. थोड्या मतांनी सुप्रिया सुळे या विजयी झाल्या होत्या. त्यामुळे यंदासुद्धा ते पुन्हा बारामतीमधूनच लढणार का इतर ठिकाणाहून हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. यासंदर्भात पक्षांतील पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेण्यासाठी पक्षांची बैठकसुद्धा पुण्यात झाली. या बैठकीला जानकर स्वतः उपस्थित होते. या बैठकीत त्यांनी मते जाणून घेतली असली तरी लोकसभा निवडणुकीत आपण कुठल्या मतदारसंघातून लढावे याबाबत काही निश्‍चित झालेले नाही.

युतीचा तिसरा मित्रपक्ष म्हणजे सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेलासुद्धा अद्याप काही मिळालेले नाही. भाजपाच्या कोट्यातूनच या सदाभाऊंना मतदारसंघ मिळणार आहे. पण तो नक्की कोणता हे अद्याप निश्‍चित झालेले नाही

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)