पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्याला अरूणाचल प्रदेशात अटक

इटानगर: इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (आयएसआय) या पाकिस्तानी गुप्तचर संस्थेसाठी हेरगिरी करत असल्याच्या संशयावरून नेपाळी समुदायातील एकाला अटक करण्यात आली. भारतीय लष्कराच्या जवानांनी अरूणाचल प्रदेशात ती कारवाई केली. निर्मल राय असे अटक झालेल्याचे नाव आहे.

निर्मलला 6 जानेवारीला भारत-चीन सीमेवर पकडण्यात आले. तो मूळचा आसामचा रहिवासी आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या (एलएसी) लगत असणाऱ्या दोन भारतीय सीमा ठाण्यांवर तो लष्करासाठी हमालीकाम करत होता. संशयास्पद वर्तणुकीमुळे त्याच्यावर लष्कराकडून महिनाभर देखरेख ठेवली जात होती. अखेर त्याला अटक करून अरूणाचल पोलिसांकडे सोपवण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

लष्कराच्या हालचाली आणि शस्त्रसाठा यांच्याशी संबंधित संवेदनशील माहिती आयएसआयला पुरवण्यात तो सामील असल्याचे प्राथमिक चौकशीतून निष्पन्न झाले. त्याने याआधी सुमारे दोन वर्षे दुबईमधील एका दुकानात काम केले. त्यानंतर आयएसआयच्या दुबईस्थित हस्तकानेच त्याच्यावर भारतीय लष्कराची माहिती पुरवण्याचे काम सोपवल्याचा संशय आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)