कचराप्रश्‍नी आयुक्‍तांना घेराव घालण्याचा प्रयत्न फसला 

पुढील दोन दिवस उचलला जाणार चोवीस तास कचरा
पिंपरी – शहारातील कचरा उचलण्याच्या नवीन निविदांनुसार कामाला दोन दिवसांपासून सुरुवात झाली आहे. मात्र, या कामाचा बोजवारा उडाला असून, त्यामुळे शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग साचले आहेत. त्यामुळे आजार पसरण्याची शक्‍यता व्यक्‍त करत राष्ट्रवादी, शिवसेना व मनसेच्या नगरसेवकांनी आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांना त्यांच्या दालनात बुधवारी (दि.3) घेराव घालण्याचा प्रयत्न केला. विरोधकांच्या आंदोलनात अत्यल्प नगरसेवकांनी सहभाग नोंदविल्याने हे आंदोलन फसल्याची चर्चा पालिका वर्तुळात रंगली होती. मात्र, अचानक झालेल्या या घेरावमुळे सुरक्षा रक्षकांची मात्र एकच धावपळ उडाली.

कचरा उचलण्याचा आठ वर्षांचा ठेका दोन ठेकेदारांना देण्यात आला आहे. 1 जुलै पासून सुरु झालेल्या या कामाचा पहिल्याच दिवशी बोजवारा उडाला. कचऱ्याच्या समस्येत दिवसेंदिवस भरच पडत आहे. सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास राष्ट्रवादीचे नगरसेवक राजू मिसाळ, मोरेश्‍वर भोंडवे, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसे गटनेते सचिन चिखले, माजी नगरसेवक मारुती भापकर, युवराज दाखले हे महापालिका आयुक्‍तांच्या दालनात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जाब विचारण्यासाठी आणि घेराव घालण्यासाठी आलेल्या नगरसेवकांनी अचानक आयुक्तांशी चर्चेचा पवित्रा घेतल्याने हे आंदोलन फसले. आयुक्‍त हर्डीकर यांनी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांच्याकडे याबाबत विचारणा केली. दोन्ही ठेकेदारांच्या प्रतिनिधींना तत्काळ बोलावून शहरातील कचरा हटविण्यासाठी पुढील दोन दिवस 24 तास कचरा उचलण्याच्या सूचना दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)