बिहारमध्ये माजी कॉंग्रेस नेत्यांच्या एकत्रीकरणाचा प्रयत्न 

पाटणा – बिहारमध्ये जुन्या नेत्यांना पुन्हा पक्षात घेण्याची तयारी कॉंग्रेसने चालविली आहे. याअंतर्गत कॉंग्रेसने पाटणा येथे एका मोठी सभा आयोजित केली आहे. 3 फेब्रुवारी रोजी पाटणा येथे कॉंग्रेस सभा घेणार आहे. ही सभा पक्षाला गतवैभव प्राप्त करण्यास सहाय्यभूत ठरणार असल्याचा दावा केला जातोय.

3 फेब्रुवारीपूर्वी किमान 12 जुन्या नेत्यांना पक्षात घेतले जाणार आहे. याची सुरुवात तारिक अन्वर यांच्या पक्ष प्रवेशापासून झाली आहे. खासदार कीर्ती आझाद देखील कॉंग्रेसमध्ये येणार आहेत. त्यांचे वडील बिहारचे मुख्यमंत्री देखील राहिले आहेत.

बिहारमध्ये जुन्या नेत्यांना सोबत घेण्यासोबतच जुन्या मतदारांना देखील बरोबर घेण्याचा प्रयत्न पक्ष करत आहे. पाटणा येथील गांधी मैदानात होणाऱ्या सभेचा मोठा परिणाम होणार असल्याचा दावा बिहार कॉंग्रेसचे प्रभारी शक्‍तिसिंग गोहिल यांनी केला.

खासदार पप्पू यादव यांना देखील कॉंग्रेसमध्ये आणण्याचा प्रयत्न होतोय. अनेक उच्चवर्णीय नेते पक्षाच्या संपर्कात आहेत. रणनीती अंतर्गत राज्यात उच्चवर्णीय आणि ओबीसी मतदारांवर पक्ष लक्ष केंद्रित करत आहे. शरद यादव यांनी त्यांच्या पक्षाचे कॉंग्रेसमध्ये विलीनीकरण करावे, असाही प्रयत्न होतोय. एकेकाळी कॉंग्रेसचा गड राहिलेल्या बिहारमध्ये पक्षाची आज दारुण अवस्था आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)