श्रीरामपुरात पोलीस कर्मचाऱ्याच्या अपहरणाचा प्रयत्न 

वाहनासह आरोपी ताब्यात : उपनिरीक्षक बहिरट, पोलीस जाधव यांनी केली सुटका

नगर – वाहतूकीसाठी अडथळा ठरत असलेल्या फॉर्च्युनर वाहनावर कारवाईकरण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे अपहरण करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी कारने वाहनाचा सिनेस्टाईल पाठलाग करून बेलापूर रस्त्यावर त्याला अडविले. व त्या पोलीस कर्मचाऱ्याची सुटका केली. श्रीरामपूर शहरात घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात विजय मकासरे (रा.राहुरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई करण्यात आली आहे. श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी रिचर्ड रघुवीर गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादीत म्हटले आहे की, दुपारी सव्वादोन वाजताच्या सुमारास पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी एक फोन आला.पोलीस ठाण्यासमोर एक फॉर्च्युनर रस्त्यावर अडथळा होईल, अशा पद्धतीने उभी आहे. तुम्ही ते वाहन रस्त्यावरुन काढुन अडथळा दूर करा व ते वाहन पोलीस ठाण्यात घेऊन या, असे सांगीतले. त्यावर गायकवाड यांनी रस्त्यावर बाजुला एक फॉर्च्युनर (नं. एम.एच.15 सी.टी. 9444 ) वाहतुकीस अडथळा केला असल्याचे निदर्शनास आले. व वाहन पोलीस ठाण्यात घ्या, असे सांगितले. व वाहन चालकाने पोलीस ठाण्यात वाहान घेतो तुम्ही बसा’, असे म्हणून वाहन चालु करून वाहन पोलीस ठाण्यात न घेता बेलापूरच्या दिशेने भरधाव वेगात घेतले. दरम्यान, पोलीस कर्मचारी गायकवाड यांनी तात्काळ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांना घडलेला प्रकार कळविला. पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, किशोर जाधव यांनी तातडीने कारमधून फॉर्च्युनरचा सिनेस्टाईल पाठलाग करून पोलीस कर्मचारी गायकवाड यांची सुटका केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)