चारित्र्याच्या संशयावरून मैत्रिणीला जाळण्याचा प्रयत्न

नगर  – चारित्र्यावर संशय घेऊन मित्रानेच विवाहित मैत्रिणीच्या घराच्या दरवाजावर पेट्रोल टाकून आग लावली. शेजारी राहणाऱ्यांनी धाव घेऊन आग विझविली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. तपोवन रस्त्यावर सोमवारी (दि.15) रात्री उशिरा ही घटना घडली.

याप्रकरणी अप्पासाहेब नारायण भागवत (रा. सावेडी, नगर) याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपोवन रस्ता परिसरातील ढवण वस्ती येथील एका महिलेच्या घरी भागवत याची ये-जा सुरू होती. तो काही दिवसांपासून महिलेच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करीत होता. सोमवारी रात्री उशिरा भागवत हा महिलेच्या घरी आला. तिने दरवाजा उघडला नाही. त्यामुळे संतापाच्या भरात त्याने दरवाजावर पेट्रोल टाकून पेटवून दिले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)