बामको: मध्य मालीतील दोन गावांवर वांशिक विद्वेषातून करण्यात आलेल्या हल्ल्यात 38 जण ठार झाल्याचे वृत्त असून यात अनेक जण जखमीही झाले आहेत.मालीत डोगन आणि फुलानी जमातीत मोठा संघर्ष आहे त्यातून डोगन जमातीच्या गावांवर हा हल्ला झाल्याचे सांगण्यात येते. या हल्ल्याची जबाबदारी अजून कोणत्याहीं गटांनी घेतलेली नाही तथापी फुलानी समुदायाच्या गटांकडूनच हा हल्ला झाला असावा असे सांगण्यात येत आहे.
गंगाफनी आणि योरो अशी या हल्ला झालेल्या दोन गावांची नावे असून ही गावे बुर्किनाफासोच्या सीमेलगत आहेत. हल्ल्याचे वृत्त कळताच गावकऱ्यांच्या जीवित आणि मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी तिथे लष्कर व सुरक्षा दलांच्या तुकड्या रवाना करण्यात आल्या आहेत. याच महिन्यात सुरूवातीला सोबाने दा या डोगन समाजाच्या आणखी एका गावावर हल्ला झाला होता त्यात 35 जण ठार झाले होते. हल्लेखोरांनी या गावातील या जमावाच्या पशुधनालाही सोडले नाहीं. अनेक पाळीव पशुंच्याही त्यांनी हत्या केल्याचे घटनास्थळी दिसून आले आहे.