रायबरेली – देशातील प्रमुख लोकसभा मतदारसंघापैकी रायबरेली हा लोकसभा मतदारसंघ चर्चेत आहे. रायबरेली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून सोनिया गांधी निवडणूक लढवत आहेत. त्याठिकाणी स्थानिक राजकारण तापू लागले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी जिल्हा पंचायत अध्यक्ष अवधेश सिंह यांच्याविरोधात अविश्वास ठराव समंत होणार होता. मात्र त्याआधीच काँग्रेस आमदार आदिती सिंह यांच्यावर हल्ला करण्यात आला.
Rae Bareli Congress MLA Aditi Singh’s vehicle was attacked on her way to Rae Bareli where she was headed for a floor test against District Panchayat Chief Awadhesh Singh;says”Attack was done on Awadesh Singh’s direction near Dinesh Singh’s college.A Singh was also present”(14 May pic.twitter.com/0ccuyxpGcN
— ANI UP (@ANINewsUP) May 15, 2019
वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, अवधेश सिंह हे रायबरेली लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवत असलेले दिनेशप्रताप सिंह यांचे बंधू आहेत. आदितीने अवधेश सिंह यांच्यावर हल्ल्याचा आरोप लावला आहे. अविश्वास ठरावावेळी मतदान करण्याआधी आदिती सिंह लखनऊवरुन रायबरेली येथे जात होत्या. तेव्हा अनेक गाड्या त्यांचा पाठलाग करत होत्या. रायबरेलीनजीक बछरावा टोल प्लाझाजवळ त्यांच्या गाडीवर फायरिंग करण्यात आली. त्यामध्ये आदिती सिंह यांच्या गाडीचा वेग वाढविण्यात आला आणि त्यामुळे गाडी पलटी झाली. यात आदिती सिंह जखमी झाल्या.