रांचीत हेरगिरी करणारी टोळी एटीएसच्या सापळ्यात – 10,000 सिमकार्डस जप्त 

रांची  – रांचीत पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारी टोळी एटीएसच्या सापळ्यात सापडली आहे. एटीएसने रांचीत कांटाटोली आणि कांके रोड या दोन ठिकाणी छापे मारून पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या डझनभर व्यक्तींना अटक केली आहे. पकडलेल्या टोळीने टेलीकॉम कंपनीचा टॉवर उभारून देशविघातक कारवाया करत होते. हा टॉवर दुबईहून ऑपरेट केला जात असल्याचे सांगण्यात आले आहे.

या टोळीकडील सुमारे 10,000 सिमकार्डस एटीएसने जप्त केली आहेत. अटक केलेल्यांची चौकशी चालू आहे.
काश्‍मीरसह देशातील विविध भागात सांप्रदायिक तेढ निर्माण करणे, दंगे घडवून आणण्याबरोबरच सामरिक दृष्टीने महत्त्वाची माहिती “लीक’ करण्याचे काम ही टोळी करत होती. या कामासाठी दुबई, पाकिस्तान आणि बांगला देशातून पैसा पुरवला जात होता. आणि अनेक देशांशी त्यांचे संबंध होते. रांचीप्रमाणेच जमशेदपूर, धनबाद, जामताडा आणि पाकुल येथेही या प्रकरणी छापासत्र सुरू आहे, मात्र पोलीस त्याबाबत गुप्तता बाळगून आहेत. एटीएसबरोबरच सीआयडी आणि स्पेशल ब्रॅंचही या कारवाईत सामील आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)