ATP World Tour Finals : जर्मनीच्या 21 वर्षीय झ्वेरेवने पटकावले विजेतेपद

लंडन – एटीपी फायनल्स टेनिस स्पर्धेतील अंतिम फेरीच्या सामन्यात जर्मनीच्या 21 वर्षीय अलेक्झांडर झ्वेरेवने सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचवर मात करत आपले पहिलेवहिले एटीपी फायनल्सचे विजेतेपद पटकावले.

अंतिम लढतीत  झ्वेरेवने नोव्हाक जोकोविचचा 6-4,6-3 असा पराभव करत विजेतेपदाला गवसणी घातली. तब्बल 23 वर्षानंतर झ्वेरेवने  जर्मनीसाठी एटीपी फायनल्सचे विजेतेपद जिंकले आहे. याआधी 1995 मध्ये बोरिस बेकरने ही स्पर्धा जिंकली होती. झ्वेरेवला बक्षिस म्हणून एटीपी फायनल्सची ट्राफी आणि 20 लाख पाउंड रक्कम मिळाली आहे.

वयाच्या 21 व्या वर्षी पहिल्यांदा एटीपी फायनल्स जिंकणारे खेळाडू इव्हान लेंडल, बोरिस बेकर,नोव्हाक जोकोविच आणि सध्याचा विजेता अलेक्झांडर झ्वेरेव हे आहेत.

दरम्यान, एटीपी फायनल्स टेनिस स्पर्धेतील उंपात्य फेरीत जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेवने स्वित्झर्लंडचा आघाडीचा टेनिसपटू राॅजर फेडररचा 7-5,7-6 असा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)