भारताच्या ‘प्रजनेश गुन्नेश्वरण’चा उपांत्य फेरीत प्रवेश

केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धा


स्वीडनच्या इलियास यमेर, कॅनडाच्या ब्रेडन चेन्यूर यांचा उपांत्य फेरीत प्रवेश

पुणे – एमएसएलटीए व पीएमडीटीए यांच्या तर्फे आयोजित पाचव्या 50000डॉलर +हॉस्पिटॅलिटी केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत एकेरीत भारताच्या प्रजनेश गुन्नेश्वरण, स्वीडनच्या इलियास यमेर, कॅनडाच्या ब्रेडन चेन्यूर या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस, म्हाळुंगे बालेवाडी येथील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत एकेरीत जागतिक क्र.110असलेल्या जागतिक क्र.189 असलेल्या कझाकस्तानच्या अलेक्‍झांडर नेदोव्हेसोव्हचा 6-4, 6-4असा संघर्षपूर्ण पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली.

1तास 26मिनिटे चाललेल्या या सामन्यात पहिल्या सेटमध्ये प्रजनेशने सुरेख सुरुवात करत सातव्या गेममध्ये अलेक्‍झांडरची सर्व्हिस ब्रेक केली व स्वतःची सर्व्हिस राखत हा सेट 37मिनिटांत 6-4असा जिंकून आघाडी मिळवली. दूसऱ्या सेटमध्ये प्रजनेशने आपले वर्चस्व कायम राखले. या सेटमध्ये 9व्या गेममध्ये अलेक्‍झांडरची सर्व्हिस भेदली व हा सेट 6-4असा जिंकून विजय मिळवला.

वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केलेल्या जागतिक क्र.355असलेल्या भारताच्या ससी कुमार मुकुंद याने तिसऱ्या मानांकित स्वीडनच्या इलियास यमेर याने जर्मनीच्या सेबस्तियन फॅसिलवचा 5-7, 6-3, 6-4असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव करून उपांत्य फेरी गाठली. हा कॅनडाच्या ब्रेडन चेन्यूरने पोर्तुगलच्या फ्रेडरिको फरेरा सिल्वाचा 7-6(6), 3-6, 7-5असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. 2 तास 26मिनिटे चाललेल्या या सामन्यात पहिल्या सेटमध्ये ब्रेडन चेन्यूरने बिनतोड सर्व्हिस व आक्रमक खेळीच्या जोरावर क्वालिफायर फ्रेडरिको फरेरा सिल्वाचा टायब्रेकमध्ये 7-6(6)असा पराभव करून आघाडी घेतली.

पिछाडीवर असलेल्या फ्रेडरिको फरेरा सिल्वाने वरचढ खेळ करत ब्रेडन चेन्यूरविरुद्ध दुसरा सेट 6-2असा जिंकून सामन्यात बरोबरी साधली. तिसऱ्या सेटमध्ये सामन्याच्या दोन्ही खेळाडूंनी आपापल्या सर्व्हिस राखल्या. त्यानंतर चौथ्या गेममध्ये ब्रेडन चेन्यूरने फ्रेडरिको फरेरा सिल्वाची, सिल्वाने ब्रेडनची सातव्या गेममध्ये सर्व्हिस रोखली. 12व्या गेममध्ये 30-40असे समान गुण असताना सिल्वाने डबल फॉल्ट केला व हा सेट 7-5असा जिंकून विजय मिळवला.

दुहेरीत उपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रेलियाच्या मॅक्‍स पुरसेलने लूक सेव्हिलच्या साथीत भारताच्या पुरव राजा व क्रोएशियाच्या अँटोनिओ सॅन्सीक या जोडीचा 5-7 6-3 13-11असा तर, तैपेईच्या हसीह चेंग पेंग व यांग सुंग हुआ या जोडीने भारताच्या अर्जुन कढे व साकेत मायनेनी यांचा टायब्रेकमध्ये 6-3, 7-6(9)असा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल : मुख्य ड्रॉ( उपांत्यपूर्व फेरी):

इलियास यमेर(स्वीडन)(3) वि.वि. सेबस्तियन फॅसिलव(जर्मनी)5-7, 6-3, 6-4;
ब्रेडन चेन्यूर(कॅनडा) वि.वि. फ्रेडरिको फरेरा सिल्वा(पोर्तुगल)7-6(6), 3-6, 7-5;
प्रजनेश गुन्नेश्वरण(भारत)(4) वि.वि. अलेक्‍झांडर नेदोव्हेसोव्ह(कझाकस्तान) 6-4, 6-4;

दुहेरी गट: उपांत्यपूर्व फेरी:

मॅक्‍स पुरसेल(ऑस्ट्रेलिया)/लूक सेव्हिल(ऑस्ट्रेलिया) वि.वि. पुरव राजा(भारत)/अँटोनिओ सॅन्सीक(क्रोएशिया)15-7 6-3 13-11;
हसीह चेंग पेंग(तैपेई)/यांग सुंग हुआ(तैपेई) वि.वि. अर्जुन कढे(भारत)/साकेत मायनेनी(भारत) 6-3, 7-6(9);
एन विजय सुंदर(भारत)/रामकुमार रामनाथन(भारत) वि.वि. संजर फैजीव(उझबेकिस्तान)/अलेक्‍झांडर नेदोव्येसोव(कझाकस्तान)6-3, 6-4
आंद्रेज मार्टिन(स्लोव्हाकिया)/हंस पॉडलिपींक कॅस्टीलो(चीन)(4) वि.वि. सिद्धांत बांठिया(भारत)/अन्वीत बेंद्रे(भारत)6-4, 6-4.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)