एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धा : लिअँडर पेस अतिंम फेरीत

नवी दिल्ली – भारताच्या लिअँडर पेस याने मेक्सिकोच्या मिग्वेल एंजल रेयेस व्हरेलाच्या साथीत शुक्रवारी फ्रान्समध्ये सुरू असलेल्या एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेच्या दुहेरीची अंतिम फेरी गाठली आहे. उपांत्य लढतील पेस आणि मिग्वेल यांनी सिमोन बोलेल्ली-डॅनिएल ब्रेशियाली या इटालियन जोडीवर 7-5, 7-6 अशी मात केली.

एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेचा दुहेरीचा अंतिमा सामना उद्या फ्रान्समध्ये होणार आहे. उद्या अंतिम सामन्यात लिअँडर पेस आणि मिग्वेल एंजल रेयेस व्हरेला यांच्या जोडीला  बेल्जियमच्या जोरन विलिगेन आणि सॅनडर गिले यांचा सामना करावा लागणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)