अँटिनिअो ग्रीझमनलाच पुरस्कार मिळावा – सिमीयोनी

माद्रिद : अॅटलिटिको माद्रिद फुटबॉल क्‍लबचे मुख्य प्रशिक्षक दियागो सिमीयोनी यांच्या मते, अँटिनिओ ग्रीझमन हाच यंदाच्या मानाच्या ‘बलोन दि ओर’ पुरस्काराचा मानकरी ठरायला हवा. त्याने फ्रान्सच्या संघाला फूटबॉल विश्वचषक जिंकून देण्यात महत्तवाची भूमिका बजावली होती. तर आपला क्‍लब अॅटलिटिको माद्रिद संघासाठी देखील मागील वर्षभर त्याने चांगली कामगिरी केली आहे.

ते पुढे बोलताना म्हणाले, लियोनेल मेस्सी आणि रोनाल्डो हे सध्या जगातील सर्वोत्तम खेळाडू आहेत. परंतु, 2018 मध्ये ग्रीझमन त्यांच्यापेक्षा चांगला खेळला आहे. त्यामुळे त्यालाच हा पुरस्कार मिळायला हवा.

-Ads-

मागील दहा वर्षांपासून मेस्सी आणि रोनाल्डो यांची या पुरस्कारावर मक्तेदारी राहिली आहे. दोघांनी प्रत्येकी 5 वेळा हा पुरस्कार पटकावण्याचा विक्रम केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)