पुणे – पुणे जिल्हा हौशी ऍथलेटिक्स संघट्नेतर्फे आयोजित केलेली जिल्हा पंच परिक्षा 23 जून रोजी होणार आहे. या परीक्षेस क्रीडा शिक्षक, माजी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू, क्रीडा संघटकांना बसता येईल.
परिक्षेच्या संयोजनासाठी आंतरराष्ट्रीय पंच बाप्टिस डीसुझा यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक समिती स्थापन करण्यात आली आहे. परिक्षेत ज्यांना भाग घ्यावयाचा आहे, त्यांनी 20 जूनपर्यंत मॅरेथॉन भवन, मित्रमंडळ चौक, पुणे येथे संघट्नेच्या सहसचिव गुरुबन्स कौर यांच्याकडे संपर्क साधावा.