आशियाई स्पर्धा 2018 : धावण्याच्या शर्यतीत भारताला आणखी एक ‘सुवर्ण’

जकार्ता – इंडोनेशियातील जकार्ता येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या खात्यात आणखी एक सुवर्णपदक जमा झाले आहे. अॅथलेटिक्स क्रीडा प्रकारात 1500 मी धावण्याच्या शर्यतीत भारताच्या जिन्सन जाॅन्सन याने  भारतासाठी सुवर्णपदक पटकाविले आहे.

पुरूषांच्या 1500 मी धावण्याच्या शर्यतीत जिन्सन जाॅन्सन याने 3:44.72 अशी वेळ नोंदवत पहिले स्थान पटकाविले आहे. त्यामुळे आता भारताच्या खात्यात 12 व्या सुवर्णपदकाची भर पडली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुरुषांच्या 800 मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदकाला गवसणी घालणारा मनजित सिंग मात्र 1500 मी स्पर्धेत चौथ्या क्रमांकावर राहिला आहे. त्याने 3:46.57 अशी वेळ नोंदवली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)