जकार्ता – इंडोनेशियातील जकार्ता येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या खात्यात आणखी एक सुवर्णपदक जमा झाले आहे. अॅथलेटिक्स क्रीडा प्रकारात 1500 मी धावण्याच्या शर्यतीत भारताच्या जिन्सन जाॅन्सन याने सुवर्णपदक जिंकल्यानंतर आता महिलांच्या 4 बाय 400 मी.रिले धावण्याच्या शर्यतीत महिला संघाने 13 वे सुवर्णपदक पटकाविले आहे.

आशियाई स्पर्धेच्या महिला 4 बाय 400 रिले क्रीडा प्रकारात भारतीय महिलां संघाने 3.28.72 अशी वेळ नोंदवत पहिले स्थान पटकाविले. या संघात हिमा दास, पूवम्मा राजू, सरिताबेन गायकवाड आणि विसमाया वेलुवाकोरोथ यांचा समावेश होता. भारताच्या खात्यात आतापर्यत 13 सुवर्णपदक जमा झाले असून अॅथलेटिक्स मधील हे 7 वे सुवर्णपदक आहे.

काही तासापूर्वी पुरूषांच्या 1500 मी धावण्याच्या शर्यतीत जिन्सन जाॅन्सन याने 3.44.72 अशी वेळ नोंदवत पहिले स्थान पटकावित 12 वे सुवर्णपदक जिंकले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)