अटलजींच्या आग्रहामुळे  तर्कतीर्थ सभेला उपस्थित 

1984 मधील एक ह्द्य आठवण
वाई: अटलबिहारी वाजपेयी राजकारणातील दिग्गज आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी समाजकारणातील दिग्गज.या थोर दिग्गजांची 1984 मध्ये भेट झाली होती आणि त्यावेळी केवळ अटलजींच्या आग्रहामुळे तर्कतीर्थ आपला नियम मोडून राजकीय पक्षाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते.

अटलजींच्या निधनानंतर अनेकांनी या ह्द्य आठवणीला उजाळा दिला.25 मार्च 84 रोजी अटलजी सातारा जिल्हा दौऱ्यावर आले होते.त्यावेळी त्यांनी सकाळी 10 वाजता वाई येथील विश्‍वकोश कार्यालयाला भेट देउन समाधान व्यक्त केले होते.तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्याबरोबर त्यांनी चर्चाही केली होती.त्यानंतर दुपारी द्रवीड हायस्कूलच्या मैदानावर भाजपची जाहीर सभा होणार होती.या सभेला तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी यावे म्हणून अटलजींनी आग्रह केला होता.तर्कतीर्थ सहसा राजकीय पक्षांच्या व्यासपीठावर जात नसत.पण अटलजींनी आग्रह केल्याने त्यांनी नियमाला बगल देउन या कार्यक्रमाला उपस्थिती लावली.

-Ads-

अटलजींचे 24 मार्च रोजीच वाईत आगमन झाले होते आणि भाजपच्या कार्यकर्त्या कमला जोग यांच्याकडेच ते उतरले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)