राजकारणातील एक तत्ववादी पर्व संपले : विखे

नगर – माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे भारतीय राजकारणातील एक तत्ववादी पर्व संपले असून, त्यांच्या रूपात एक समर्पित, संवेदनशील आणि खंबीर नेतृत्व हरपल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. कवि मनाचे वाजपेयी संवेदनशील तर होतेच. पण ते तेवढेच कणखरही होते. देशहित हेच त्यांचे पहिले प्राधान्य होते. पंतप्रधान म्हणून त्यांनी देशासाठी भरीव योगदान दिलं. 1991 मध्ये भारताने उदारीकरणाचे धोरण स्वीकारले आणि वाजपेयींच्या काळात त्याला गती देण्यात आली. पंतप्रधान म्हणून त्यांनी अनेक चांगले निर्णय घेतले.

त्या काळात वडील बाळासाहेब विखे पाटील यांनी संत तुकाराम महाराजांची प्रतीमा असलेले नाणे काढण्याची मागणी केली होती आणि त्या मागणीला वाजपेयी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. तसा निर्णय घेऊन त्यावर तातडीने अंमलबजावणी करण्यात आली व नवी दिल्लीतील एका सोहळ्यात थाटामाटात संत तुकाराम महाराजांची प्रतीमा असलेल्या नाण्याचे अनावरण झाले, अशी आठवणही विखे पाटील यांनी विषद केली.

एक उत्तम वक्ते म्हणून देखील वाजपेयींचे नेहमीच स्मरण केले जाईल. त्यांचे अनेक भाषण,कविता आपण ऐकल्या आहेत. अतिशय परखड आणि नेमक्‍या शब्दांत व्यक्त होण्याची विलक्षण शैली त्यांच्याकडे होती. त्यांच्या देहबोलीतून आणि शब्दांतून त्यांचा बाणेदारपणा प्रकट होत असे. त्यांच्या निधनामुळे भारताची मोठी हानी झाली असून, भारताच्या संसदीय लोकशाहीच्या इतिहासात त्यांचे नाव अजरामर राहिल, या शब्दांत विखे पाटील यांनी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण केली.

कवी मनाचे दिलदार नेतृत्व हरपले-आ.थोरात

देशाच्या राष्ट्रीय पातळीवर आपल्या कवी मनाने व अमोघ वक्तृत्व शैलीने अधिराज्य गाजविणारे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी ही राजकारण विराहित आदर्श व्यक्‍तीमत्व होते. लोकशाहीत सुसंवाद व वैयक्तिक मैत्रीचा संदेश देणाऱ्या अटलजींनी युनोत केलेले पहिले हिंदीतील भाषण आंतरराष्ट्रीय पातळीवर ऐतिहासिक ठरले. पाकिस्तानच्या युध्दात इंदिर गांधी यांच्या कणखर भूमिकेचे कौतुक करतांना त्यांनी एक नवा आदर्श निर्माण केले. भारतीय राजकारणातील स्वच्छ प्रतिमा असलेले अटलजींच्या निधनाने देशाचे सर्वसमावेशक व दिलदार नेतृत्व हरपले असल्याची भावना कॉंग्रेसचे राष्ट्रीय नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्‍त केली आहे.

राजकारणातील आदर्श नेता – आ.डॉ.तांबे

व्यक्तीदोष न करता लोकशाहीत प्रेमाचा संदेश त्यांनी दिला. कारगील युध्द भारताला जिंकून देणारे पत्रकार, अभ्यासू व दुरदृष्टी नेतृत्व लाभलेल्या अटलजींच्या कविता आजही अनेकांच्या ओठावर आहे. त्यांच्या निधनाने देशाचा राजकारणातील आदर्श नेता हरपल्याची भावना आ. डॉ. सुधीर तांबे यांनी व्यक्त केली आहे.

ऋषितुल्य व्यक्तीमत्वाला देश मुकला – आ. कोल्हे

अटलबिहारी वाजपेयी हे अनेकांचे प्रेरणा स्थान आहेत. निष्कलंक, आजातशत्रु, संवेदनशिल कविमनाचे परंतु कणखर बाणा असलेले भाजपचे आधारवड महानायक होते. अशा ऋषितुल्य व्यक्‍ती महत्वाला आज भारत देश मुकला असे मत आमदार स्नेहलता कोल्हे यांनी व्यक्‍त केले.

अटलजी युवकांसाठी आदर्श – सत्यजित

उकृष्ठ संसदपटू असलेल्या अटलबिहारी वाजपेयी यांनी चार दशके संसदेत प्रतिनिधित्व करतांना सुसंस्कृतपणातून देशापुढील एक आदर्श निर्माण केला. कवी मनाच्या वाजपेयींनी प्रतिभावंत व गुणवतांना नेहमी प्रोत्साहन दिले. वादापासून दुर असलेल्या वाजपेयींनी युवकांसाठीचे आदर्श असल्याची भावना प्रदेश युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी दिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)