नवी दिल्ली – देशाचे माजी पंतप्रधान, राजकारणातील महाऋषी, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आज अनंतात विलीन झाले. संध्याकाळी पाचच्या सुमारास  दिल्लीतील राजघाटावर राष्ट्रीय स्मृतिस्थळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अटलजींना अखेरचा निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनसागर उपस्थित होता.

अटलजींवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मानसकन्या नमिता भट्टाचार्य हिने वाजपेयींच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकया नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, भाजपाध्यक्ष अमित शाह, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे याच्यांसह दिग्गज नेते अंत्यविधीला उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)