भाजप मुख्यालयातून निघेल माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची अंत्ययात्रा

नवी दिल्ली – भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे पार्थिव आज रात्री दिल्लीतील  कृष्णा मेनन मार्गावरील  त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे. शुक्रवारी सकाळी 9 वाजता त्यांचे पार्थिव शरीर भाजपाच्या मुख्यालयात आणले जाईल.

दुपारी 1.30 वाजता भाजप कार्यालय ते राजघाट येथील राष्ट्रीय स्मृतिस्थळापर्यत त्यांची अंत्ययात्रा काढण्यात येईल. संध्याकाळी 5 वाजता तेथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी माहिती मिळत आहे.

दरम्यान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. तसेच भाजपाच्या सर्व कार्यालयातील झेंडे निम्म्यावर आणले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
1 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)