तिसऱ्या दिवसअखेर भारत अ संघाला नाममात्र आघाडी

माऊंट मॉंगमाय (न्यूझीलंड): न्यूझीलंडच्या शेवटच्या जोडीने केलेल्या 83 धावांच्या जिगरबाज खेळीमुळे भारत अ संघाला मोठी आघाडी घेण्याची संधी दिली नाही. एकवेळ 9 बाद 375 अशी अवस्था असणाऱ्या यजमान संघाने आपला डाव 9 बाद 458 वर घोषित केला. यामुळे भारत अ संघाला न्यूझीलंड अ संघाविरुद्धच्या अनधिकृत पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात 9 धावांची नाममात्र आघाडी मिळाली आहे. तिसऱ्या दिवसाखेर भारतीय संघाने बिनबाद 35 अशी मजल मारली आहे.

भारताने दिलेल्या 467 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंड अ संघाने चांगला खेळ केला. 375 धावांच्या मोबदल्यात 9 गडी बाद झाल्यावर त्यांच्या शेवटच्या जोडीने 83 धावांची उपयुक्त भागीदारी रचली. 10 व्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या सेथ रान्सने 57 चेंडूत नाबाद 69 धावा केल्या तर 11व्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या ब्लेअर टिकनरनरने नाबाद 30 धावा बनवत भारतीय गोलंदाजास जेरीस आणले. न्यूझीलंडने आपला डाव 9 बाद 458 वर घोषित केला. त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजीस उतरलेल्या भारतीय संघाने दिवसाखेर बिनबाद 35 पर्यंत मजल गाठली. त्यात पृथ्वी शॉ ने 26 चेंडूत नाबाद 33 धावा केल्यातर अनुभवी मुरली विजयने 22 चेंडूत नाबाद 2 धावा केल्या.

-Ads-

तत्पूर्वी, तिसऱ्या दिवसाची सुरुवात भारत अ संघासाठी चांगली झाली. दुसऱ्या दिवशी 1 बाद 176 धावा करणाऱ्या न्यूझीलंडचा डाव तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या तासात 5 बाद 211 असा गडगडला. यात शतकवीर हमीष रुदरफोर्ड (114) आणि आर. रवींद्र यांना दिपक चाहरने बाद केले. टिम सिफर्ट मोहंमद सिराजच्या गोलंदाजीवर पार्थीव पटेलकडे झेल देऊन बाद झाला. तर नवदीप सेनीने ग्लेन फिलिप्प्सला बाद केले. परंतु त्यानंतर न्यूझीलंडच्या उर्वरित फलंदाजांना लवकर बाद करण्यात भारत अ संघाला यश आल्याने मोठी भारत अ संघ मोठी आघाडी घेऊ शकला नाही.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)