केंद्र, राज्यात एकाच पक्षाचे सरकार असावे

विनोद तावडे यांचे मते : एमआयटी-एडीटी विद्यापीठाचा पहिला पदवी प्रदान समारंभ

पुणे – महाराष्ट्रात आघाडीचे सरकार असताना माजी तंत्र शिक्षणमंत्री राजेश टोपे यांना निर्णय घेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. याचा परिणाम शिक्षणाचे धोरण ठरविण्यावर होत होता. सर्व क्षेत्राचे धोरण ठरविताना केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाचे स्थिर सरकार असल्यास अडचणी येत नाहीत. त्यामुळे मतदारांनी कोणत्याही एकाच पक्षाचे स्थिर सरकार निवडावे, असे मत महाराष्ट्र राज्याचे शालेय व उच्च तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी शनिवारी येथे व्यक्‍त केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

एमआयटी आर्ट, डिझाइन आणि टेक्‍नॉलॉजी विद्यापीठाचा पहिला पदवी प्रदान सोहळा राजबाग लोणी काळभोर येथील संकुलात झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. विश्‍वनाथ कराड, माजी केंद्रीय मंत्री डॉ. अरिफ महमद खान, संस्थेचे विश्‍वस्त प्रा. प्रकाश जोशी, जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार डॉ. चंद्रकांत पांडव, संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. मंगेश कराड, कुलगुरू डॉ. सुनील राय, कुलसचिव शिवशरण माळीसह आदी उपस्थित होते. कलाक्षेत्रासाठी उषा मंगेशकर, डिझाइनमधील संशोधनासाठी सुधाकर नाडकर्णी व तंत्रज्ञानातील योगदानाबद्दल संजय काटकर यांना मानद विद्यावाचस्पती पदवी प्रदान करण्यात आली.

तावडे म्हणाले, खासगीकरणामुळे परदेशात शिक्षणाला जाणारे भारतात शिक्षण घेत आहेत. याचा आनंद आहे. विद्यार्थ्यांनी केवळ पदवी घेण्याची मानसिकता बदलावी आणि अनुभवात्मक शिक्षण पद्धतीची अवलंब करावा. दीक्षांत हा शिक्षांतचा अंत नसून येथून पुढे खऱ्या अर्थाने स्नातकांचे शिक्षण सुरू होते. पालकांच्या विचारात बदल व्हावे. विद्यापीठे केवळ बेरोजगार तयार करणारे केंद्र नसावे, तर क्षमताधारक आणि स्कील निर्माण करणारी असावीत. प्रत्येकाच्या क्षमतानुसार शिक्षण मिळावे. कोणत्याही क्षेत्रातील आवडते शिक्षण विद्यार्थ्यांना घेता यावे. यासाठी राज्य सरकार नेहमी सकारात्मक विचार करत असते. विद्यार्थी केंद्रीत शिक्षण पद्धतीसाठी सरकार कटीबद्ध आहे. कला असून चालत नाही, तर कलेत माणुस असावा लागतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)