पुणे विद्यापीठात आता “अॅॅस्ट्रोस्टॅटिस्टिक्‍स’चे धडे

देशातील दुसरीच संस्था : खगोलशास्त्र माहितीचे संख्याशास्त्रातून विश्‍लेषण

पुणे- खगोलशास्त्र (astronomy), खगोलभौतिकशास्त्र (astrophysics) आणि मोठ्या प्रमाणावर गोळा होणाऱ्या संख्यात्मक माहितीचे संगणकाच्या सहाय्याने विश्‍लेषण (big data computation) करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे “अॅॅस्ट्रोस्टॅटिस्टिक्‍स’ विषयावरील अभ्यासक्रम सुरू केला आहे. असा अभ्यासक्रम असणारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे देशभरात दुसरे विद्यापीठ ठरले आहे.

-Ads-

“अॅॅस्ट्रोस्टॅटिस्टिक्‍स’हा अभ्यासक्रम विद्यापीठाच्या संख्याशास्त्र विभागात सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती विभागप्रमुख डॉ. टी. व्ही. रामनाथन्‌ यांनी दिली. पुण्याव्यतिरिक्त कोलकाता विद्यापीठात हा अभ्यासक्रम सुरू आहे.

डॉ. रामनाथन म्हणाले, “अलीकडे आढळलेल्या गुरुत्वीय लहरी, खगोलशास्त्र (astronomy), खगोलभौतिकशास्त्र (astrophysics) संदर्भातील नवीन घडामोडी यांविषयी शास्त्रज्ञ व संशोधकांना सातत्याने वेगळी माहिती मिळत आहे. इस्रोच्या चांद्रयान आणि मार्स ऑर्बिटर मिशन या मंगळ मोहिमेविषयी भारतात आकर्षण निर्माण झाले आहे. या मोहिमांमधून सातत्याने नवीन माहिती उपलब्ध होत आहे. विश्‍वातील अगणित रहस्यांविषयी हाती येत असलेली निरीक्षणे पाहता त्या माहिती व निरीक्षणांचा संख्याशास्त्राच्या माध्यमातून अभ्यास करून वेगळ्या पद्धतीने या माहितीचे विश्‍लेषण करता येईल, या विचाराने हा अभ्यासक्रम विद्यापीठात सुरू करण्यात आला आहे. विद्यापीठातील संख्याशास्त्र (स्टॅटिस्टिक्‍स), सेंटर फॉर मॉडेलिंग आणि सिम्युलेशन (सी.एम.एस.) आणि गणितशास्त्र विभागातील एकूण 40 विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर खगोलशास्त्र व खगोलभौतिकशास्त्र या विषयांसंदर्भात आतापर्यंत उपलब्ध माहितीवर विश्‍लेषणात्मक काम करण्याची संधी भविष्यात विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे.’

“अॅॅस्ट्रोस्टॅटिस्टिक्‍स’ म्हणजे काय?
“अॅॅस्ट्रोस्टॅटिस्टिक्‍स’ म्हणजे अवकाशासंदर्भात होणाऱ्या विविध संशोधनातून उपलब्ध झालेल्या माहिती व निरीक्षणांचा संख्याशास्त्राच्या माध्यमातून अभ्यास करून वेगळ्या पद्धतीने केलेले विश्‍लेषण.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)