आसामला दुसरे काश्‍मीर बनू दिले जाणार नाही

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर अमित शहा यांची भूमिका

लाखिमपूर, (आसाम) – जम्मू काश्‍मीरमधील पुलवामा इथे “सीआरपीएफ’च्या जवानांवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यातील शहिदांचे बलिदान वाया जाऊ दिले जाणार नाही. पुलवामा हल्ल्यातील दोषींची गय केली जाणार नाही. कॉंग्रेसप्रमाणे भाजप राष्ट्रीय सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड करणार नाही, असे भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी म्हटले आहे. बहुचर्चित नागरिकत्व दुरुस्ती विधेयकासंदर्भात बोलताना “आसामला दुसरे काश्‍मीर बनू दिले जाणार नाही.’ असे सूचक वक्‍तव्यही अमित शहा यांनी केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अमित शहा यांनी याप्रसंगी कॉंग्रेसबरोबरच भाजपचा पूर्वाश्रमीचा मित्रपक्ष आसाम गण परिषदेवरही जोरदार टीका केली. कॉंग्रेस आणि आसाम गण परिषद या दोन्ही पक्ष सर्वाधिक काळ सत्तेत राहूनही त्यांनी “आसाम करारा’ची अंमलबजावणी केली नाही. आसाम करारवर 1958 साली स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. आसामला दुसरे काश्‍मीर बनू द्यायचे नाही. म्हणूनच राष्ट्रीय नागरिकत्व रजिस्टर (एनआरसी) करण्यात आले आहे. या “एनआरसी’च्या सहकार्याने आम्ही प्रत्येक घुसखोराला बाहेर काढण्यास कटिबद्ध आहोत.

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाबाबत काही गैरसमज पसरवण्यात आलेले आहेत. हे विधेयक केवळ आसाम आणि ईशान्येतील राज्यांसाठीच आहे, असाही एक गैरसमज आहे. आलेल्या सर्व शरणार्थींना देशभरात आश्रय देण्यासंदर्भातील तरतूद या विधेयकामध्ये आहे. आसाममधील लोकसंख्येच्या समतोल बदलतो आहे. नागरिकत्व विधेयक नसेल तर आसाममधील नागरिक धोक्‍यात राहतील, असेही अमित शहा म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)