प्रसिद्ध टीव्ही अभिनेता राहुल दीक्षितची गळफास घेऊन आत्महत्या

मुंबई : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता राहुल दीक्षित याने आज बांद्र्यातील लोखंडवाला कॉम्प्लेक्स मधील आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी उघडकीस आली आहे. राहुलने आपल्या बेडरूमच्या छताला स्वतःला बेडशीटद्वारे टांगून घेतल्याचे लक्षात येताच त्याच्या कुटुंबीयांनी त्याला नजीकच्या रुग्णालयामध्ये दाखल केले. मात्र उपचारांपूर्वीच २८ वर्षीय राहुल याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

राहुलने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज असला तरी आत्महत्या करत असल्याबाबतचे पत्र पोलिसांना मिळाले नसल्याने संशयाला जागा निर्माण झाली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)