‘असमा जहांगीर’ यांना मरणोत्तर ‘प्रतिष्ठित मानवाधिकार पुरस्कार’

संयुक्त राष्ट्राने पाकिस्तानची प्रख्यात कार्यकर्ता असमा जहांगीर यांना मरणोत्तर प्रतिष्ठित मानवाधिकार पुरस्कार देऊन सन्मानित केले. संयुक्त राष्ट्र संघाने ऑक्टोबर महिन्यात असमा जहांगीर यांना हा पुरस्कार देण्याची घोषणा केली होती. मंगळवारी त्यांची मुलगी मुनीजा जहांगीर यांनी एका विशेष समारोहात संयुक्त राष्ट्र महासभाची अध्यक्ष मारिया फर्नेंडा एस्पिनोसाकडून हा पुरस्कार स्विकारला.

मानवाधिकार क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना हा प्रतिष्ठित पुरस्कार देण्यात येतो. हा पुरस्कार आतापर्यंत मार्टिव लूथर किंग, नेल्सन मंडेला आमि जिमी कार्टक सारख्या महान व्यक्तींना देण्यात आला आहे. आता या यादीत असमा जहांगीर यांचे नाव देखील जोडले गेले आहे.

असमा जहांगीर त्या मोजक्याच कार्यकर्त्यांपैकी आहेत, ज्यांनी हुकूमशाही पाकिस्तानी सरकारच्या अन्यायाविरूध्द आवाज उठवला. त्यांनी पाकिस्तानी सैन्याच्या हुकूमशाहीचा देखील विरोध केला. यावर्षी 11 फेब्रुवारीला त्यांचे निधन झाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)