भारताच्या शरत कमलने ४-० ने केले पराभूत

जकार्ता – खेळाच्या मैदानावर वय वगैरे याला महत्व नसतं, महत्वाची असते ती जिद्द आणि भावना. जकार्ता येथील आशियाई स्पर्धेत एका अशा खेळाडूने भाग घेतला आहे, ज्याने वयाची पन्नाशी पार केली आहे. पाकिस्तानचा टेबल टेनिस खेळाडू मुहम्मद आसिम कुरैशी ५२ व्या वर्षी आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करत आहे.

आज आशियाई स्पर्धेत पाकिस्तानी खेळाडू कुरैशी याचा टेबल टेनिसचा सामना भारताच्या अचंत शरत कमल विरूध्द होता. हा सामना भारताच्या शरत याने सहज जिंकला. शरत कमलने पाकिस्तानचा खेळाडू कुरैशी याचा १८ मिनिटाच्या आत ४-० (११-४,११-८,११-७,११-५) ने पराभव करत पुढील फेरीत प्रवेश केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)