आशियाई क्रीडा स्पर्धा – पुरूष स्क्‍वॅश संघास ‘कांस्यपदक’

जकार्ता – इंडोनेशियातील जकार्ता येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या तेराव्या दिवशी भारताच्या खात्यात आणखी चार पदकांची भर पडली आहे. आतापर्यंत भारताची एकूण पदकांची संख्या ही 63 झाली आहे. नौकानयन स्पर्धेत एक रौप्य आणि दोन कांस्य अशी तीन पदके  भारताने जिंकली. त्यानंतर आता स्क्‍वॅश या क्रीडाप्रकारात भारतीय पुरूष संघाने कांस्यपदक पटकाविले आहे.

स्क्‍वॅश या क्रीडाप्रकारात उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय पुरूष संघाचा हाँगकाँगच्या संघाने 0-2 असा पराभव केला. त्यामुळे भारतीय संघाला कांस्यपदकावरच समाधान मानावे लागले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान यापूर्वी आज तेराव्या दिवशी नौकानयन या स्पर्धेत सेलिंग या प्रकारात भारतीय महिला संघाच्या वर्षा गौतम आणि श्वेता शर्वेगर यांनी रौप्यपदक पटकाविले. तर याच प्रकारात पुरूष गटात वरूण ठक्कर आणि गणपती यांनी सांघिक कांस्यपदक पटकाविले. दुसरीकडे हर्षिता तोमर हिने देखील अोपन लेजर 4.7 स्पर्धेत कांस्यपदक पटकाविले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)