आशियाई स्पर्धा : भारतीय पुरूष कबड्डी संघाचा अाशियाई स्पर्धेत पहिला पराभव

जकार्ता – भारतीय पुरूष संघाच्या आशियाई  कबड्डीमधल्या विजयरथाला अखेर रोखले. भारतीय संघाला साखळी फेरीतच पराभवाला सामोरे जावे लागले आहे. आज झालेल्या सामन्यात दक्षिण कोरियाने भारतीय संघाचा २४-२३ अशा गुणफरकाने पराभव केला आहे.

अतितटीच्या झालेल्या सामन्यात अवघ्या एका गुणामुळे भारतीय संघाला पराभव स्विकारावा लागला आहे. ग्रुप अ मध्ये असणाऱ्या भारतीय संघाचा हा पहिला पराभव आहे. याआधी श्रीलंका आणि बांग्लादेश यांच्याविरूध्द ग्रुप स्तरावर खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळविला होता. मात्र तिसऱ्याच सामन्यामध्ये दक्षिण कोरियाने हा विजयरथ रोखला आहे.

दक्षिण कोरियाने सुरवातीपासून सामन्यावर पकड ठेवली होती. मध्यांतरापर्यत दक्षिण कोरियाने सामन्यामध्ये १४-११ अशी आघाडी कायम ठेवली होती.भारतीय संघाने विजय मिळविण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला पण यश मात्र दक्षिण कोरियाच्या हाती लागलं. भारतीय खेळाडूंच्या खेळाशी परिचित असलेल्या जॅंग कुन लीच्या अनुभवाचा फायदा दक्षिण कोरियाच्या कामी आला. सामन्याच्या शेवटच्या क्षणी एक अंक मिळवून त्याने दक्षिण कोरियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

आशियाई खेळाच्या इतिहासात भारतीय पुरूष संघाने कबड्डीत सलग सात सुवर्णपदकांची कमाई केली आहे. याआधी २०१६ साली अहमदाबाद येथे झालेल्या कबड्डीच्या विश्वचषकादरम्यान सलामीच्या सामन्यात कोरियाने भारतावर मात केली होती, त्यानंतर आज आशियाई स्पर्धेत कोरियाने पुन्हा एकदा पराभूत केले आहे.या पराभवामुळे भारतीय संघाच्या कबड्डीतल्या आव्हानाला कोणताही धोका नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)