आशियाई स्पर्धा: भारतीय महिला कबड्डी संघाचा सलग तिसरा विजय

जकार्ता: आज (दि. २१) सकाळी भारतीय महिला कबड्डी संघाने  गट अ मधील सामन्यात श्रीलंकेच्या महिला कब्बडी संघाला ३८-१२ असे पराभूत केले. या विजयासह त्यांनी गट साखळीत आपला दबदबा कायम ठेवला. काल भारतीय पुरुष संघाला दक्षिण कोरिया विरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता.

भारतीय महिला संघाने सुरुवातीपासूनच सामन्यावर पकड मजबूत केली होती. त्यांनी विरोधी संघाला गुण मिळणार नाही याची दक्षता घेत सामन्यात १४-० अशी आघाडी घेतली.  पहिल्या सत्रातील या निकालावरून स्पष्ट होते की महिला कबड्डीमध्ये  मोठा उलटफेर होणार नाही.

दुसऱ्या सत्रात श्रीलंकेच्या संघाने थोडा प्रतिकार केला परंतु भारतीय महिला कबड्डीपटूंच्या कामगिरीच्या जवळपास देखील पोहचण्यात त्यांना अपयश आले. भारतीय महिला कबड्डी संघाने आपली आघाडी ३२-५ अशी केली. त्यानंतर भारतीयांनी सामना ३७-१० अश्या गुणसंख्येवर नेऊन ठेवला आणि शेवटी सामना ३८-१२ असा जिंकला. भारतीय महिला संघाचा आशियाई स्पर्धेत सलग तिसरा विजय आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)