अॅथलीट नवऱ्याला प्रोत्साहान देण्यासाठी इंडोनेशियात पोहचली ‘ही’ टिव्ही अभिनेत्री

नवी दिल्ली – अठराव्या आशियाई खेळांना आजपासून इंडोनेशियात सुरूवात होत आहे. इंडोनेशियातील जकार्ता आणि पालेमबर्ग या शहरांमध्ये खेळाचे सामने पार पडणार आहेत. आशियाई खेळांचा उद्धघाटन सोहळा आज होणार आहे.

विविध खेळात सहभागी होण्यासाठी भारतीय खेळाडू सुध्दा इंडोनेशियात दाखल झाले आहेत. भारतीय जलतरणपटू संदीप सेजवाल हा त्याची पत्नी म्हणजेच टिव्ही अभिनेत्री ‘पूजा बॅनर्जी’ हिच्यासोबत इंडोनेशियात पोहचला आहे.

-Ads-

पूजा हिने म्हटले आहे की, ‘मी माझ्या पतीसारखीच खूप उत्सुक आहे. पहिल्यादांच संदीपसोबत मी एखाद्या मोठ्या स्पर्धेत त्याला प्रोत्साहान देण्यासाठी जात आहे’. मागील वेळेस साउथ कोरिया मध्ये झालेल्या आशियाई खेळात संदीप हा पदक पटकवणारा एकमेव भारतीय जलतरणपटू होता. पुढे बोलताना पूजा म्हणाली की, ‘यावेळेस मात्र मी संदीपचा खेळ प्रत्यक्ष पाहण्यास आणि त्याला प्रोत्साहान देणयास खूप उत्सुक आहे’.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)