आशियाई स्पर्धेतील पदकविजेत्या खेळाडूंचे मायदेशी जोरदार स्वागत

नवी दिल्ली – जकार्तामध्ये नुकत्याच संपन्न झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी करत एकूण 69 पदकं जिंकली. यामध्ये 15 सुवर्ण, 24 रौप्य आणि 30 कांस्य अशा पदकांचा समावेश आहे.

आशियाई स्पर्धेत चांगली कामगिरी करत पदक मिळविणारे खेळाडू हळुहळु आपल्या राज्यात परतत आहे. आशियाई स्पर्धेत चांगली कामगिरी करत भारतासाठी पदक जिंकणाऱ्या खेळाडूंचे भारतीय चाहत्यांकडून जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे. त्यापैकी काही खेळाडूंची जल्लोषात झालेल्या स्वागताचे फोटो खालीलप्रमाणे.

गुवाहटी – आशियाई स्पर्धेत 400 मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्यपदक विजेती खेळाडू हिमा दास हिचे गुवाहटी येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

 

कोलकत्ता – आशियाई स्पर्धेत महिलांच्या हेप्टॅथलॉनमध्ये पहिल्यांदा सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या स्वप्ना बर्मन हिचे कोलकत्ता येथील विमानतळावर जोरदार स्वागत करण्यात आले.

 

चेन्नई – आशियाई स्पर्धेत धरूण आय्यासामी आणि अरोकिया राजीव यांनी धावण्याच्या शर्यतीत रौप्यपदक पटकाविले. तमिळनाडू ऍथलेटिक्स असोसिएशनने आयोजित केलेल्या सत्कार समारंभात दोघे खेळाडू आपली पदके दाखविताना.

 

नवी दिल्ली – भारतीय लष्करप्रमुख बीपीन रावत यांच्यासमवेत आशियाई स्पर्धेत पदक जिंकणारे भारतीय लष्करातील खेळाडू.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)