आशियाई क्रीडा स्पर्धा : नौकानयन ‘सेलिंग’ प्रकारात भारताला तीन पदके

जकार्ता – इंडोनेशियातील जकार्ता येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या तेराव्या दिवशी भारताच्या खात्यात आणखी तीन पदकाची भर पडली आहे. नौकानयन स्पर्धेत भारताने तीन पदके जिंकली आहेत.

नौकनयन स्पर्धेतील सेलिंग 49 ईआर एफएक्स या क्रीडाप्रकारात भारतीय महिला संघाच्या वर्षा गौतम आणि श्वेता शर्वेगर यांनी दुसरे स्थान पटकावित रौप्यपदक पटकाविले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नौकनयन सेलिंग स्पर्धेतच पुरूषांच्या गटात वरूण ठक्कर,गणपती चेंगप्पा यांनी कांस्यपदक पटकाविले आहे.

हर्षिता तोमर हिने अोपन लेजर 4.7 स्पर्धेत  कांस्यपदक पटकाविले आहे. तिने 15 रेसेसमध्ये 62 गुण मिळवित तिसरे स्थान पटकाविले.

https://twitter.com/ioaindia/status/1035478456908300288

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)