आशियाई स्पर्धा : भारताने पदकाचे उघडले खाते

10 मी. एअर रायफल सांघिक प्रकारात भारताला कांस्यपदक

जकार्ता – इंडोनेशियाची राजधानी जकार्ता मध्ये शनिवारी 18 व्या अाशियाई क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन झाल्यानंतर आज रविवार पासून स्पर्धा सुरू झाल्या आहेत. नेमबाजीमध्ये आज अपूर्वी चंदेला आणि रवि कुमार तसेच मनु भाकर आणि अभिषेक वर्मा या भारतीय खेळाडूंचे सामने होते. यामध्ये पहिल्याच दिवशी भारतीय नेमबाजपटूंनी पदकाची कमाई केली आहे.

यामध्ये अपूर्वी चंदेला आणि रवि कुमार यांच्या जोडीने 10 मी. एअर रायफल सांघिक प्रकारात अंतिम फेरीत कांस्यपदक पटकाविले आहे. अंतिम फेरीत या जोडीने कोरिया, मंगोलिया या प्रतिस्पर्ध्यांचा सामना करत भारतासाठी कांस्यपदक पटकाविले आहे.

दरम्यान दुसरीकडे मनु भाकेर- अभिषेक वर्मा मात्र  10 मी. एअर पिस्टल सांघिक प्रकारात अंतिम फेरीत पोहचण्यात अपयशी ठरले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)