पावसामुळे अंतिम सामना रद्द, भारत-पाकिस्तान संयुक्त विजेते

आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2018 

मस्कत – आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या हॉकीचा अंतिम सामना रविवारी झालेल्या जोरदार पावसामुळे होऊच शकला नाही. त्यामुळे आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या हॉकीचा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रद्द करण्यात आल्याने दोन्ही देशांना संयुक्त विजेतेपद देण्यात आलं.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, भारतीय संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्राफीतील उपांत्य फेरीतील सामन्यात जपानचा 3-2 असा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली होती. तर पाकिस्तान संघाने मलेशियाचा टायब्रेकरमध्ये 7-5 असा पराभव करत अंतिम फेरी गाठली होती.

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघाने प्रत्येकी दोनदा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचा किताब जिंकला आहे. मात्र काल झालेल्या पावसामुळे सामना होऊ न शकल्यामुळे दोन्ही देशांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)