नवी दिल्ली – तैपेईच्या तायुअन येथे सुरू असलेल्या आशियाई एअरगन नेमबाजी स्पर्धेत कनिष्ठ गटात श्रेया अग्रवाल हिने विश्वविक्रम केला आहे. श्रेयाने कनिष्ठ गटात १० मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक पटकावले आहे.
18 वर्षीय श्रेयाने अंतिम सामन्यात 252.5 गुण प्राप्त करत विश्वविक्रम आपल्या नावे केला. तर मेहुल घोष हिने 228.3 गुण मिळवित या स्पर्धेत कांस्यपदक पटकाविले. या स्पर्धेत भारतीय नेमबाजानी आतापर्यंत 12 सुवर्ण, 5 रौप्यपदक आणि 5 कांस्यरपदकांची कमाई केली आहे.
श्रेयाने महिला 10 मीटर एअर रायफल प्रकारात चीनच्या रूओझू झाओ हिचा विक्रम मोडला. रूओझू हिने मागील वर्षी 22 एप्रिल ला कोरिया मध्ये झालेल्या जागतिक चॅम्पियनशिप स्पर्धेत 252.4 गुण प्राप्त करत विश्वविक्रम केला होता.