दुबई – आशिया चषक स्पर्धेतील पहिल्या सामन्यात बांग्लादेशने श्रीलंकेचा 137 धावांनी पराभव केला आहे. नाणेफेक जिंकून बांग्लादेशने प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेसमोर 262 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या संघ 35.2 षटकात 124 धावांच करू शकला.

पहिल्याच षटकांत दोन बळी गमावल्यानंतर मुश्फिकुर रहीम याच्या 144 आणि मोहम्मद मिथुन याच्या 63 धावांच्या बळावर बांग्लादेश  261 धावा उभारू शकला. श्रीलंकेकडून लसिथ मलिंगा याने 4 बळी घेतले.

श्रीलंकेकडून एकही फलदांज मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. बांग्लादेशच्या गोलंदाजाच्या भेदक माऱ्यासमोर श्रीलंकेचा संघ केवळ 124 धावाच उभारू शकल्याने 137 धावांनी पराभव स्विकारावा लागला. बांग्लादेशकडून मश्रफी मोर्तुझा, मुस्तफिजूर रहमान, मेहदी हसन मिराज यांनी प्रत्येकी 2 तर शाकिब अल हसन,  रुबेल हुसेन आणि मोसाद्देक हुसेन यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.

बाग्लांदेशच्या मुश्फिकुर रहीम याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. त्याने कारकिर्दीतील सहावे शतक झळकावताना 150 चेंडूत 11 चौकार आणि 4 षटकार लगावताना 144 धावांची खेळी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)