आशिया कप २०१८ : आशिया कप सुरू होण्याआधी श्रीलंकेच्या संघाला झटका

नवी दिल्ली – आशिया कप शनिवारी (15 सप्टेंबर) सुरू होत आहे. आशिया चषकात भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश, अफगाणिस्तान आणि हाँगकाँग हे संघ सहभागी होणार आहेत. स्पर्धेतील पहिला सामना बांग्लादेश आणि श्रीलंका याच्यांत होणार आहे, पण स्पर्धा सुरू होण्यापूर्वी श्रीलंका संघाला एक मोठा झटका बसला आहे.

श्रीलंकेचा सलामीवीर फलंदाज ‘दनुष्का गुणाथिलाका’ हा पाठदुखीच्या कारणामुळे आशिया कपमधून माघार घेत आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार 27 वर्षीय फलंदाज गुणाथिलाका हा सरावादरम्यान दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे तो दुबईहून मायदेशी परतणार आहे.

गुणाथिलाकेच्या जागी शेहान जयसूर्या या फलंदाजाला श्रीलंका संघात घेण्यात आले आहे. सोमवारी श्रीलंकेचा कसोटी कर्णधार दिनेश चंदीमल याने देखील दुखापतीमुळे या स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यामुळे श्रीलंका संघासमोरील अडचणी वाढत असल्याचे दिसत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)